सर्किट बेंचच्या तयारीची खासदार धनंजय महाडिक व भाजपा प्रमुख पदाधिकारी यांच्या कडून पाहणी 

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 5 Second

 

कोल्हापूर प्रतिनिधी/ मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झाल्यामुळे पक्षकारांना विनाविलंब न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. खंडपीठ कृती समिती सदस्य आणि वकिलांसह सर्किट बेंच तयारीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.


मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरला व्हावे, यासाठी कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील वकिलांनी रस्त्यावर उतरून, तब्बल ४० वर्षापेक्षा अधिक काळ संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाला १० दिवसापूर्वी यश आले आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांनी कोल्हापूरच्या सर्किट बेंचची घोषणा १ ऑगस्ट रोजी केली. तेव्हापासून सीपीआरसमोरील न्यायालयीन इमारतीत सर्किट बेंचची तयारी युध्द पातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि न्यायपालिका या तयारीवर काटेकोरपणे लक्ष ठेवून आहे. आज खासदार धनंजय महाडिक यांनी सर्किट बेेंच तयारीची पाहणी केली. खंडपीठ कृती समिती, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य यासह मान्यवर वकिलांसमवेत त्यांनी ही पाहणी केली. तसेच सर्किट बेंचच्या कामकाजाविषयी माहितीही बारकाईने जाणून घेतली. ज्येष्ठ वकिल धनंजय पठाडे यांनी खासदार महाडिक यांना सर्किट बेंच कामकाजाची माहिती दिली. या बेंचमध्ये सहा न्यायमूर्तींच्या उपस्थितीत न्यायालयीन कामकाज चालेल. त्यासाठी २८ सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली असून, लवकरच न्यायालयीन कर्मचारी वर्गही उपलब्ध होईल, असे ऍड. पठाडे यांनी सांगितले.

याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. पी. एस. पाडेकर यांच्याशी खासदार महाडिक यांनी बातचित केली. कोल्हापूरला सर्किट बेंच मिळाल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच वकिलांची जबाबदारी मोठया प्रमाणावर वाढली आहे. यातून वकिलांनी पक्षकारांना जलद आणि विनाविलंब न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत रहावे, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली.
१७ ऑगस्ट रोजी सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा होण्यासाठी आपले सहकार्य राहील, अशीही ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. यावेळी ऍड. प्रमोद दाभाडे, संगीता तांबे, मनिषा सातपुते, सौरभ सरनाईक, स्नेहल गुरव, सौरभ सरनाईक, मनिष कदम, वैभव पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, आप्पा लाड, हेमंत आराध्ये, किरण नकाते, विजय खाडे, राजसिंह शेळके, श्‍वेता गायकवाड, प्रसाद जाधव, डॉ. आनंद गुरव यांच्यासह कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.

——————— जाहिरात ———————–

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now