कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाची तयारी : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून आढावा

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 37 Second

कोल्हापूर, दि. १२ : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १७ ऑगस्ट रोजी होणार असून, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांचा सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांवर चर्चा झाली असून, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि अतिथींच्या सोयी-सुविधांवर विशेष भर देण्यात आला. यावेळी अतिरीक्त पोलीस आयुक्त धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीत सर्किट बेंच इमारत, कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण, शासकीय विश्रामगृह आणि इतर निवासस्थाने यांच्याशी जोडलेल्या रस्त्यांचा तसेच सुरक्षाविषयक बाबींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. जिल्हाधिकारी येडगे यांनी सर्व विभागप्रमुखांना स्पष्ट सूचना दिल्या की, कार्यक्रमाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची धावपळ होऊ नये यासाठी पूर्वतयारी करावी. विशेषतः, कोल्हापूर जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यांतून येणाऱ्या वकिल, न्यायालयीन अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांची संख्या मोठी असल्याने वाहनतळ व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे. प्रत्येक ठिकाणी विभागवार पार्किंगची व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले असून, यामुळे वाहतुकीची कोंडी टाळता येईल असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हाधिकारी येडगे यांच्या आदेशानुसार प्रत्येक बाबनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये विविध विभागांचे अधिकारी समाविष्ट असून, त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी दररोज संबंधित ठिकाणी भेटी देऊन कामांची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. सुरक्षितता समिती कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि रस्त्यांवर पोलिस बंदोबस्ताची तपासणी करेल, तर वाहतूक समिती पार्किंग आणि रस्ते व्यवस्थेची जबाबदारी सांभाळेल. निवास व्यवस्था समिती अतिथींच्या राहण्याच्या सोयींची खातरजमा करेल.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, हा कार्यक्रम केवळ कोल्हापूरसाठीच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन निर्दोष आणि सुरळीत व्हावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. त्यांनी पुढे सांगितले की, कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, वरिष्ठ अधिकारी, वकिल संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने कोणत्याही छोट्या चुकीला वाव देणार नाही. या आढावा बैठकीत पोलिस विभाग, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी आपापल्या विभागातील तयारीबाबत माहिती दिली.

——————– जाहिरात————————-

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *