महापालिकेच्या गणेशोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद, इराणी खणीमध्ये सावर्जनिक मंडळाच्या १५६१ व घरगुती व मंडळांच्या लहान १२०३ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन..

0 0

Share Now

Read Time:9 Minute, 48 Second

कोल्हापूर ता.०७ :- महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी विसर्जनावेळी शहरात ठिकठिकाणी २२ महापालिकेच्यावतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक विसर्जन मिरवणुकी वेळी स्वयंचलित यंत्राद्वारे तसेच सार्वजनिक मंडळांनी चारही विभागीय कार्यालय अंतर्गत घरगुती व मंडळांच्या लहान मूर्तीसह १२०३ गणेश मूर्ती या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी विसर्जित केल्या. या सर्व मुर्त्या महापालिकेच्या वतीने संकलित करुन इराणी खणीमध्ये पर्यावरण पूरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेला अर्पण केलेल्या आणि इराणी खण येथे सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या १५६१ मोठ्या गणेश मूर्ती व १२०३ लहान गणेश मुर्ती अशा २७६४ गणेश मुर्ती इराणी खण येथे पर्यावण पुरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास शहरातील अनेक मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून गणेशमुर्ती अर्पण केल्याबद्दल व विसर्जन मिरवणूक नियोजन पध्दतीने व शांततेने पार पाडल्याबद्दल महापालिकेच्यावतीने सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आभार व्यक्त केले. हे विसर्जन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, आरोग्य, पवडी, सफाई, विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी, अग्निशमन जवान, वैद्यकीय पथक, हमाल, क्रेन चालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांनी सलग दिवस व अहोरात्र काम केल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार प्रशासकांनी व्यक्त केले.

   पापाची तिकटी येथे क्रांतिवीर भगतसिंग व वाईट आर्मी रेस्क्यू फ्रेंड सर्कल या मंडळांच्या शेवटची गणपतीची आरती पहाटे ४:४५ वाजता पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच मिरवणूक मार्गावरून येणाऱ्या प्रतिभानगर येथील राजर्षी शाहू महाराज फ्रेन्ड  मंडळांची शेवटची गणेशमुर्तीची  सकाळी ९:०० वाजता  इराणी खण येथे विसर्जनासाठी आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी महापालिकेचे व पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान महापालिकेच्यावतीने अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश विर्सजनाचे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी येथील स्वागत मंडपामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी व इतर अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ, पान, सुपारी व रोप देऊन स्वागत करण्यात आले. पापाची टिकटी येथील स्वागत मंडपात २९७ गणेश मंडळांची नोंद झाली असून निर्माण चौक येथील पर्यायी मिरवणूक मार्गावरील महापालिकेच्या स्वागत मंडपात ३१६ गणेश मंडळांची नोंद झाली.

महापालिकेची सर्व यंत्रणा २५ तासाहून अधिक काळ राबली.

          महापालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विर्सजन मार्गावर सर्व यंत्रणा २५ तासाहून अधिक काळ राबली. महापालिकेच्यावतीने विसर्जनापूर्वी मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडूजी, अतिक्रमण व इतर अडथळे हटविण्यात आली  होती. विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी मोठे एलईडी लावून लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग, वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले होते. इराणी खणीसह मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून विर्सजन स्थळी तातडीने स्वच्छता करण्यात येत होती. मिरवणूक मार्गावर व इराणी खण येथील विसर्जनाच्या स्थळी वैद्यकिय पथके नेमण्यात आली होती. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात करण्यात आली होती. सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी इराणी खणीवर चार क्रेन व १० फ्लोटिंग तराफ्यांची सोय करण्यात आली होती. विसर्जनाच्या कामकाजाकरिता पवडी, आरोग्य, उद्यान व इतर विभागांचे सुमारे तीन हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्याचबरोबर १०० टेंपो, ४१५ हमाल, ५ जेसीबी, ७ डंपर, ४ पाणी टँकर, २ बूम, ६ ॲम्बुलन्स व इतर यंत्रणा होती. महाद्वार रोडवरील धोकादायक इमारतीच्या ठिकाणी बंदिस्त बॅरकेटस लावण्यात आले होते. विसर्जना दरम्यान आरोग्य विभागा, धर्माधिकारी प्रतिष्ठाण व अवनी संस्थेकडून विर्सजनाच्या ठिकाणी आलेले ३५ मे.टन. १० डंपरद्वारे गोळा करण्यात आले. गोळा झालेले निर्माल्य उठाव करून खत प्रक्रिया करण्यास पाठविण्यात आले.

   यावेळी इराणी खण येथे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त कपिल जगताप,परितोष कंकाळ, किरणकुमार धनावडे, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, नगरसचिव सुनील बिद्रे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुण गुजर, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्राबरे, सहा.विद्युत अभियंता नारायण पुजारी, अमित दळवी, वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी २५ तासाहून अधिक तास काम करून पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे विसर्जन यशस्वीरित्या पार पाडले.

विसर्जन मार्गावरून दहा ट्रॅक्टर चपलांचा ढीग उठाव

  शहारातील मिरवणूक संपल्यानंतर तातडीने महापालिकेच्यावतीने मुख्य मिरवणूक मार्गाची साफसफाई करण्यात आली. यामध्ये बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वारोड, पापाची तिकटी, बिन खांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, गंगावेश, रंकाळा वेश, रंकाळा टॉवर, जुना वाशी नाका व इराणी खण या मुख्य रोडवरीलवरील साधारणता १० ट्रॉली पेक्षा जास्त चपलांचा ढिग व इतर कचरा युद्धपातळीवर आरोग्य विभागाच्या वतीने उठाव करण्यात आला.

–जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात —

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *