फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 22 Second

सांगली, दि. २६ : नैसर्गिक आपत्तीचे आव्हान पेलताना नागरिकांनी भविष्यकालीन संकटे ओळखावीत. महापुराचा पूर्वानुभव लक्षात घेता, कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार करावा लागेल. वारंवार पूरबाधित होणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनीही आपली मनस्थिती बदलावी, असे आवाहन करून फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात आले आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत 25 फायबर ग्लास बोटींच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. सरकारी घाट, आयर्विन पुलाजवळ, सांगली येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, कार्यकारी अभियंता (इ व द) कुंडलिक उबाळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी अंतर्गत १८ प्रवासी क्षमतेच्या २३ फायबर ग्लास यांत्रिक बोटी व जिल्हा परिषद स्वीय निधी अंतर्गत १८ प्रवासी क्षमतेची १ व ८ प्रवासी क्षमतेची १ फायबर ग्लास यांत्रिक बोटी अशा २५ फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोनशीला अनावरण करून व ताबा पावती वितरणाद्वारे करण्यात आले.जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषद, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४-२५ अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण या बोटींची खरेदी करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्याचे गटविकास अधिकारी तसेच, चारही तालुक्यातील पूरबाधित गावांचे सरपंच, नागरिक  यांना बोटींची ताबा पावती वितरीत करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे,यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांच्यासह लाभार्थी तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.

शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायत मणदूर व देववाडी, वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायत कोळे, बनेवाडी, चिकुर्डे, रेठरे हरणाक्ष, बहे, मसुचीवाडी व तांबवे, बोरगांव पलूस तालुक्यातील चोपडेवाडी, संतगांव (राडेवाडी), बुर्ली, दहयारी, तुपारी, नागठाणे, सुखवाड व अंकलखोप व मिरज तालुक्यातील ढवळी, म्हैशाळ, वड्डी, निलजी बामणी, जुनी धामणी, सावळवाडी व कसबे डिग्रज या ग्रामपंचायतींना नवीन यांत्रिक फायबर ग्लास बोटी वितरीत करण्यात आलेल्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *