कोल्हापूर दि. २७ . परमपुज्य बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोका विजयी दशमी म्हणजेच १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, प्रेम, शांती याची शिकवण देणाऱ्या बुद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथे घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली.
ज्या भारत भूमीमध्ये बुद्ध धम्माचा जन्म झाला त्याच भूमीत बुद्ध धम्म संपष्ठात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत भूमी मध्ये बुद्ध धम्मात प्रवेश करून भारतामध्ये बुद्ध धम्माला पुनर्रजिवित केले. या धम्मक्रांतीमुळे जगमाध्ये चैत्यन्य निर्माण झाले. जगाने या धम्मक्रांतीचे स्वागत केले. या धम्मक्रांतीमुळे हजारो वर्षाच्या मानसिक गुलामीचा अंत झाला आणि नव्याने माणसाच्या उन्नतीच्या युगाला सुरूवात झाली, माणूसपण हारविलेल्या कोठयावधी माणसांच्या जिवनाला अर्थ प्राप्त झाला.त्यादिनानिमित्त गेली १० वर्षे कोल्हापूर जिल्हयातील बौद्धांच्या वतीने पेठवडगाव ता. हातकणंगले ते ऐतिहासीक स्पर्शभूमी माणगाव या ठिकाणी दोन चाकी, चार चाकी गाडी मधून पांढऱ्या शुभ्र वस्त्रे परिधान करून हाती पंचशील ध्वज घेवून हजारो धम्मबंधू-भगिनींच्या उपस्थीतीत महारॅली काढली जाते आणि डॉ. बाबासहेब आंबेडकर यांना सामुदायिक अभिवादन केले जाते. तसेच या दिवशी काही बंधू भगिनी बुद्ध, धम्माची दीक्षा घेवून आपल्या नवीन जीवन पद्धतीला सुरूवात करतात .
यावर्षी गुरूवार दि.०२ ऑक्टोंबर २०२५ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला ६९ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने याही वर्षी भव्य धम्मचक्र प्रवर्तन महारॅली आयेजित केलेली आहे.
बौद्ध बांधवानी आपल्या कुटुंबासहीत पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये पंचशील ध्वज घेवून बौद्ध समाजाचा घटक म्हणून सहभागी व्हायचे आहे. तसेच या महारॅलीचा महाबोधी महाविहार, बुद्धगया, बिहार मुक्त आंदोलनास जाहीर पाठींबा असून संपूर्ण महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी या महारॅलीच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत.
सदरची रॅली बुद्ध, सम्राट अशोक, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात शांत पद्धतीने रॅली असणार आहे तरी रॅलीमध्ये बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग व्हावे. असे पत्रकार परिषदेत समविचारी परिवर्तन चळवळी तर्फे आवाहान करण्यात आले.
=============जाहिरात============