सावनी रवींद्रच्या आवाजातील ‘उदो अंबाबाई’ गाण्याने यंदाची नवरात्र केली स्पेशल

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 22 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी यंदाच्या नवरात्रीत राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं ‘उदो अंबाबाईचा’ हे गोंधळ गीत विशेष गाजताना दिसत आहे . ‘गौराई आली घराच्या भरघोस प्रतिसादानंतर करवीरवासीनी अंबाबाईचा महिमा सांगणार गोंधळ गीत ‘उदो अंबाबाईचा’ने महाराष्ट्रभर साऱ्यांना थिरकायला भाग पाडलं. नटराजाची विशेष कृपा लाभलेला लावणीकिंग आशिष सुरेश पाटीलची या गाण्यासाठी विशेष साथ लाभली. सध्या या गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळत असताना यादरम्यानचसावनीने कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी तिने अंबाबाईसाठीचे गोंधळ गीत देवी आईला समर्पित केलं.

‘उदो अंबाबाई’ या गाण्याला संगीतकार विजय नारायण गावंडे यांनी संगीत दिलं असून वैभव देशमुख यांनी या गीताला शब्दबद्ध केलं आहे. तर सावनी रविंद्रने तिच्या सुमधूर स्वरात हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. काही दिवसांपूर्वी सावनी मंगोलियात झालेल्या आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्ट युनियन (एबीयु) सॉंग फेस्टिवल मध्ये प्रतिनिधित्व केल्याने चर्चेत आली.
भारताकडून सावनीची या महोत्सवासाठी निवड करण्यात आली आणि ही अर्थातच वाखणण्याजोगी बाब आहे. यावेळी मंगोलियामध्ये सावनीने तिच्याच अल्बममधील ‘रंग दे’ या हिंदी गाण्याची निवड केली आणि जागतिक व्यासपीठावर तिनं भारताचे प्रतिनिधित्व केलं. यानंतर ऐन नवरात्रीत आलेल्या सावनीच्या ‘उदो अंबाबाई’ या गीताने कोल्हापूरकरांना आणि महाराष्ट्रीयांना खुश केलं आहे.

============जाहिरात=============

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *