विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : जिल्हा माहिती कार्यालय सांगलीतील एक अत्यंत आदर्श , पितृतुल्य असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरवलं आहे.
रोनीओ ऑपरेटर या पदावर कार्यरत असलेल्या सुभाष थोरात यांचं आज दुःखद निधन झालं. सुभाष थोरात येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार होते. शनिवार पर्यंत आपल्यात काम करणारे, आपल्या प्रत्येक हाकेला धावून येणारे ,अत्यंत धीरोदात्त असे सुभाष थोरात आज अचानकपणे आपल्यातून निघून गेले आहेत.
त्यांच्या जाण्याने जिल्हा माहिती कार्यालयाची आणि व्यक्तिगत आम्हा सर्वांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. जिल्हा माहिती कार्यालयात वर्ग चारच्या पदांवर काम करत असूनही पदाच्या मर्यादा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीच अडचण ठरल्या नाहीत. कर्मचारी संघटनेचे ते राज्य पातळीवरील नेते राहिले आहेत . सुभाष थोरात यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो आणि या अत्यंत दुःखद अशा प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला धीर देवो, सांत्वन देवो , हीच ईश्वरचरणी प्रार्थना.