मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोरोनासारख्या भयाण वास्तव्यामुळे सर्वत्र बिकट अवस्था निर्माण झाली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत पण आता या मूलभूत गरजा पूर्ण करणं देखील अनेकांसाठी आव्हानात्मक वाटू लागले आहे.
सध्याच्या परिस्थितीत ज्यांच्या हातावर पोट आहे अशा लोकांवर एका वेळेच्या जेवणासाठीसुध्दा संघर्ष करायची वेळ आली आहे. पण या अशा संकंटकाळी प्रसंगात एक व्यक्तीच दुस-या व्यक्तीच्या मदतीस येत आहे , हे आपण सर्वजण पाहतोय. विविध सामाजिक संघटना, प्रशासन, मदतदार, दानशूर लोकांनी अडचणीत अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मदतीचे स्वरुप काही ठिकाणी आसरा आहे तर काही ठिकाणी अन्नदान.
अशाच परिस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या छत्रछायेखाली कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी तुमच्या-आमच्या सारखे सामान्य पण कर्तृत्वाने महान असणा-या व्यक्तींनी घेतली आहे.
‘एन.एम. एंटरप्रायझेस’चे मालक आणि ‘वास्तव्य ग्रुप’चे सपोर्ट पार्टनर निलेश मुणगेकर यांनी पंढरी नगरीतील गरजू लोकांना अन्न मिळावे , या हेतूने ‘राजा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून अन्नदानाची सोय केली. तसेच त्यांनी आपल्या आगामी ‘हेरिटेज मिस्टर मिसेस आणि मिस महाराष्ट्र मॉडेलिंग’च्या उपक्रमामधून हे अन्नदान सुरु ठेवले आहे.
इतकेच नव्हे तर समाजसेवेत कायम पुढाकार घेणा-या
निलेश मुणगेकर यांनी सोलापूरच्या तुळजापूर देवीच्या मंदिरात देखील गरजू लोकांसाठी अन्नदान केले आहे. आणि सख्या मामाच्या स्मरणार्थ त्यांनी लॉकडाऊनच्या तारखेपर्यंत म्हणजेच १७ मे पर्यंत वृद्धाश्रमात जेवणाची सोय केली आहे.
अशाप्रकारे कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘एन.एम.एंटरप्रायझेस’चे मालक निलेश मुणगेकर हे आपल्या परीने मोलाचा वाटा उचलत आहेत आणि ‘ या लढाईत कोणीच एकटे नाही, आपण सर्वजण एकत्र आहोत’ असा संदेश देऊन प्रोत्साहन देखील देत आहेत. त्यांच्या या स्वभावामुळे ‘माणुसकी’ पुन्हा अधोरेखित झाली आहे, असे म्हणता येईल.