
कोल्हापूर : कोल्हापुरात बिबट्या आल्याची चर्चा होती. बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाकडून शोध मोहीम सुरू असतानाच बिबट्या चकवा वनविभागाला देत होता. मंगळवारी दुपारी विवेकानंद महाविद्यालय परिसरात काही लोकांना बिबट्या दिसला. याबाबतची माहिती मिळताच कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर वन विभागला पाचारण करण्यात आले बिबट्याचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर शोधू सुरू असताना शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके व पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचून शोध सुरू केला.
इतक्यात झाडावर बिबट्यानं थेट शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कृष्णात पाटीलसह पोलीस कर्मचाऱ्यावर झडप घातली यावेळी ते पाटील जमिनीवर कोसळले. हातात असलेल्या काठीनं त्यांनी प्रतिकार करताच बिबट्या पुन्हा झाडावरून भिंतीच्या पलीकडे पळाला कोल्हापूर पोलीस दल आणि वनविभागाच्या वतीनं बिबट्याला कसून शोधण्याचं काम सुरू केले उच्चभ्रूवस्ती मध्ये बिबट्या आल्याने शहरातील नागरिकांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून विवेकानंद परिसरामध्ये बघ्यांची गर्दी प्रचंड प्रमाणात होती त्याचबरोबर वनविभाग व पोलीस प्रशासनाला अथक प्रयत्नाने बिबट्याला अखेरजेर बंद करण्यात यश आले.
जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात 
