डोंगराळ भागातील रस्त्यांची दुरावस्था पाहून रयतेचा आमदार सुरेश खाडे आज दुखी झाले.

 

आमदार सुरेश खाडे गेली वीस वर्ष मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.या वीस वर्षात आमदार सुरेश खाडे यांनी आपल्या मतदार संघाच्या विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी वाटप केला. हा रयतेचा आमदार दरवेळी निवडून येत राहिले. या रयतेच्या आमदाराला असे वाटले की मी कोट्यावधी रुपये माझ्या मतदार संघासाठी आणि विकास कामासाठी खर्च केले आहेत ते खरोखरच सार्थकी लागली आहेत का ?

याचा आनंद उराशी बाळगून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त आपल्या मतदारसंघात फेरफटका मारण्यासाठी निघाला. स्वतः आपल्या मतदार संघाची खरी परिस्थिती काय आहे, विकास कोणत्या पद्धतीने झाला आहे हे जाणून घेण्यासाठी  आमदारांनी दौरा सुरू केला आणि खरी परिस्थिती पाहिल्यानंतर हा रयतेचा आमदार मनोमनी दुखी झाला. अंतकरणापासून या रयतेच्या आमदाराला दुःखाच्या वेदना होऊ लागल्या.मी इतका पैसा विकास कामासाठी दिला, पण शाश्वत विकास बाजूलाच राहिला अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली.मतदार संघातील मळा भाग डोंगराळ भाग या ठिकाणी असणाऱ्या व खडकाळ भागातील रस्त्यांची अवस्था दुरावस्था फार मोठी आहे हे आमदारांच्या लक्षात आले. या भागातील लोक पावसाळ्यात कशा पद्धतीने जीवन जगत असतील त्यांना किती वेदना त्रास सहन करावा लागत असेल हे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर त्यांना जाणवले. मनोमनी त्यांना असं वाटू लागलं की मी सर्वांना मिंदे केले, पण हे दुष्टचक्र माझेच माझ्या भोवती फिरत आहे, याचीही जाणीव त्यांना झाली. माझ्याच लोकांनी मला किती फसवले याचीही जाणीव त्यांना झाली. व्यतीत अंतकरणाने हा रयतेचा आमदार निवडणूक निमित्ताने मतदारसंघात फिरत आहे. या आमदाराने स्वतः निर्णय घेतला की,मिरज तालुक्यातील 11 जिल्हा परिषद गट व 22 पंचायत समिती गणातील सदस्यांसाठी एक नवी फळी तयार करायची,आणि ती त्यांनी केली.पण त्यातही जवळ असणारे गद्दार आणखीन किती पोळी भाजून घेता येईल याचा प्रयत्न करू लागल्याचे चित्र या आमदाराच्या निदर्शनास येऊ लागले.खरोखरच आमदार सुरेश खाडे यांच्या बद्दल लोकांच्या मनात आजही फार मोठा आदर आहे,पण विभीषण सारखे लोक आमदार खाडे साठी घातक ठरत आहेत. म्हणूनच खाडे प्रचारात सर्व मतदारांना सांगत आहेत की पॅनल टू पॅनल मतदान करा. इकडे तिकडे एक मत असं करू नका. असं करणार असाल तर मला मतच देऊ नका अशा स्पष्ट हताश प्रतिक्रिया आमदार खाडे मतदार जनतेसमोर देत आहेत.या आमदाराचा गैरफायदा सर्वांनीच घेतला, अशा प्रतिक्रियाही जनतेतून ऐकावयास मिळू लागल्या. यश अपयश लवकरच समजणार आहे अजून चार वर्षे या आमदाराची कारकीर्द राहिली आहे.सर्वच प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत.

Advertisements

मालगाव जिल्हा परिषद मतदार संघातील गुंडेवाडी भागात जानकर वस्तीची पाहणी केल्यानंतर वाडी वस्तीतील रस्त्यांची दुरावस्था आमदार खाडे यांच्या लक्षात आली. सोबत असणारे सवंगडी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे येत नव्हते,अलिप्त राहण्याची भूमिकाच त्यांनी स्वीकारली.निवडणूक निकालानंतर या रयतेच्या आमदाराला पुढील भूमिका आणि रणनीती काय करायची याची दिशा ठरवावी लागणार आहे. निवडणूक निकालाची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिलीआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *