Kolhapur (Gokul Shirgaon): पत्रकार हा शासनमान्य अन् समाज मान्य असावा – संथापक-अध्यक्ष शिवाजी शिंगे(व्हिडीओ)

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 43 Second

युवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन पदाधिकारांची निवड; हितचिंतकांची सत्कार सोहळा उत्साहात

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पत्रकार हा शासनमान्यसह तो समाज मान्य असला पाहिजे. त्याच्यामध्ये सामाजिक इमानदारी असायला हवी. समाजात वावरताना पत्रकाराचा रुबाब हा त्याच्या लेखणीत असला पाहिजे, असे प्रतिपादन युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यचे संथापक-अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी केले. ते गोशिमा येथे झालेल्या सत्कार सोहळाप्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी गोकुळ शिरगावचे सरपंच महादेव पाटील हे होते.

दरम्यान, गोकुळ शिरगाव भागातील उल्लेखनीय सामाजिक कामगिरी केलेल्याचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तामगावचे पोलीस पाटील अरविंद कर्णिक, सरपंच सुधीर कांबळे,(तामगाव) महादेव पाटील(गोकुळ शिरगाव) वैजयंती मेवेकरी, करुणा कांबळे, राजश्री पोवार. वाठारचे महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी प्रकाश कांबळे, (उजळाईवाडी) येथील पत्रकार संतोष सावंत यांची युवा पत्रकार संघाचे करवीर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. गांधीनगर सुनील कट्यार. रत्नदीप चव्हाण मुबारक अतार, जय हुपरिकर यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.

यावेळी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यचे राज्य उपाध्यक्ष रविसागर हळवणकर, राज्य कार्याअध्यक्ष, रतन हुलस्वार, सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष कुरणे , शरद माळी, प्रसिद्धीप्रमुख जावेद देवडी, बाबूराव वळवडे, नियाज जमादार, रविराज जगताप, गायत्री माजगावकर, स्नेहा शिंगेसह विविध दैनिकाचे पत्रकार, छायाचित्रकार, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यचे संथापक-अध्यक्ष शिवाजी शिंगे
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *