Share Now
Read Time:55 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/जावेद देवडी): कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता बड्या नेत्यांसह इतरांनीही शड्डू ठोकत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. नुकताच बाजीराव सदाशिव नाईक यांनीही कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी आपला अर्ज भरून संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे.

यावेळी त्यांनी ‘मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, जनता हाच माझा पक्ष आहे. त्यामुळे मी अपक्ष राहून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. याद्वारे मी माणूस म्हणून समाजाची सेवा करीत राहणार आहे.

Share Now