मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शीकेमध्ये नमुद केलेल्या सूचनांनुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये खर्च निरीक्षक यांनी उमेदवारांनी ठेवलेले निवडणूक खर्च विषयक लेखे किमान तीनवेळ तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार 44-सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे लेखे तपासणी विषयक वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

उमेदवारांचे लेखे तपासणी विषयक वेळापत्रक तपासणीचा दिनांक व कंसात तपासणी कालावधी पुढीलप्रमाणे – 15 एप्रिल 2019 (दिनांक 28 मार्च 2019 ते 14 एप्रिल 2019), 18 एप्रिल 2019 (दि. 15 एप्रिल 2019 ते 17 एप्रिल 2019), 21 एप्रिल 2019 (दि. 18 एप्रिल 2019 ते 20 एप्रिल 2019). या दिनांकास तपासणी करिता उमेदवारांनी परिशिष्ठ 11, मूळ प्रमाणके, तपासणी दिनांकापर्यंत अद्ययावत बँक पासबुक या अभिलेखासह उपस्थित राहावे.

डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नमूद वेळापत्रकाप्रमाणे उमेदवार/उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी विहित वेळेत अभिलेख निवडणूक खर्च निरीक्षक यांना उपलब्ध करून न दिल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 प्रमाणे उमेदवारांनी प्रतिदिन अभिलेख अद्ययावत ठेवले नसल्याचे समजण्यात येवून भारतीय दंड संहितेतील कलम 171 आय प्रमाणे कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी.
