Share Now
Read Time:1 Minute, 6 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सरीता नंदकुमार मोरे यांच्या सासूबाई आणि माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार बाळकृष्ण मोरे तसेच माजी नगरसेवक सुभाष बाळकृष्ण मोरे यांच्या मातोश्री शांताबाई बाळकृष्ण मोरे यांचे शुक्रवारी (दि. १२) राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.
त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात 4 मुले, 1 मुलगी, सूना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच त्यांचा धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सहभाग असायचा.
रक्षा विर्सजन रविवार (दि. 14 रोजी) सकाळी 9.00 वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.
Share Now