Getting your Trinity Audio player ready...
|
क्षयरोग विभाग, कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग कामकाज उद्दिष्टपुर्तीसाठी आवश्यक संशयित क्षयरुग्ण थुंकी नमुने तपासणी, निदान, औषधोपचार या सर्वच निकाषांवर उत्कृष्ट काम केलेमुळे महाराष्ट्रातील 22 महानगरपालिकांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने अव्वल स्थान प्राप्त केले.
हे यश प्राप्त करणेसाठी क्षयरोग विभागाकडील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सन 2020 मध्ये सरकारी दवाखान्या बरोबरच खाजगी दवाखान्यात निदान होणारे क्षयरुग्ण यांचेवर अधिक लक्ष केंद्रीत केले. कारण सरकारी दवाखान्यात निदान होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत खाजगी दवाखान्यांकडील क्षयरुग्णांची नोंदणी शासनाकडे करुन घेणे आव्हानात्मक होते. यासाठी क्षयरोग विभागाकडील अधिकारी आणि कर्मचारी यांनी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या प्रत्यक्ष भेटी, मिटींग, कार्यशाळा घेऊन त्यांचा या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभाग वाढविला. परिणामस्वरुप कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील जवळपास 90 ते 95 टक्के खाजगी दवाखान्यातील क्षयरुग्णांची नोंद शासन दरबारी करुन घेणेत यश आले. या कामी शहरातील विविध मेडिकल असोशिएशन, खाजगी औषध विक्रेते, अन्न व औषध प्रशासन कार्यालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शहर क्षयरोग कार्यालयाच्यावतीने वरिल सर्व सुविधा जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहचविणेसाठी जनतेने न घाबरता किंवा क्षयरोगाच्याबाबतीत असणारी सामाजिक बहिष्काराची भावना मनात न ठेवता. लवकरात लवकर निदान व औषधोपचारासाठी पुढे आले पाहिजे. तसेच आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांचे पर्यंत हा संदेश पोहचविणे आवश्यक आहे. कारण क्षयरोग हा औषधोपचार घेतलेस पुर्णपणे बरा होणारा आजार आहे.
औषधोपचार न घेतलेस किंवा अर्धवट औषधोपचार घेतलेस एम.डि.आर.सारखा भयंकर क्षयरोग होऊ शकतो. त्यामुळे क्षयरोग मुक्त कोल्हापूर मोहिमेमध्ये सहभागी होणेचे आवाहन शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी केले.
आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, आरसीएच ऑफिसर डॉ.अमोल माने, शहर क्षयरोग विभागातील अभिनय पोळ, सुशांत कांबळे, प्रविण क्रुझ, डॉ.इम्रान जमादार, मनिषा देसाई आदी उपस्थित होते.