मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) -लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी 19 एप्रिल 2019 रोजी सकाळी 6.30 रन फॉर व्होटचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या युवक-युवती व नागरिक यांना सहभागी होता येणार आहे. या रॅलीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिक, खेळाडू, विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रन फॉर व्होट रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 15 ते 18 एप्रिल 2019 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली व छत्रपती शिवाजी स्टेडिअम सांगली येथील महानगरपालिका क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत तसेच शहीद मॅरेथॉन कार्यालय, फेडरल बँक समोर, अनंतश्री अपार्टंमेंट, 100 फुटी रोड, विश्रामबाग सांगली येथे नावनोंदणी सुरु आहे. रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या प्रथम 1000 हजार स्पर्धकांना टी-शर्ट व पुढील 1000 स्पर्धकांना टोपी देण्यात येणार आहे.

या रॅलीचा मार्ग पुष्कराज चौकातून सुरुवात होऊन, मार्केट यार्ड – बापट मळा (महावीर उद्यान) – चांदणी चौक – गुलमोहर कॉलनी – त्रिकोणी बाग – सिव्हील चौक – राम मंदिर कॉर्नर आणि शेवट पुष्कराज चौक असा 3 किलोमीटर इतका आहे.
Good