सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे सर्वत्र ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण यामध्ये सातत्याने वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या विषयासाठी सर्वांनी आपली जबाबदारी म्हणून पर्यावरण रक्षणाचे काम केले पाहिजे. पर्यावरण पूरक शहराच्या निर्मितीसाठी किंवा पर्यावरणाच्या रक्षणासाठी जास्तीत जास्त काम होण्याच्या हेतूने भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज निसर्गदूत फौंडेशनची स्थापना करण्यात येत आहे. संस्थेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी जास्त ऑक्सिजन देणारी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. तसेच जास्त कार्बन डायऑक्साईड शोषणारी विशिष्ट झाडे लावण्यात येणार आहेत. संस्थेच्या माध्यमातून लावण्यात येणारी सर्व झाडे संगोपणाच्या दुष्टीने त्या-त्या परिसरातील नागरिक व पर्यावरण प्रेमी यांना दत्तक स्वरूपात जबाबदारी देऊन त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. नौसार्गिक स्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी सोलर, पवनचक्की, बायोगॅस अशा नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करण्यावर भर देणे अशा पर्यावरण पूरक राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी निसर्गदूत फौंडेशन कार्यरत राहणार असून कोल्हापूर शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी भौगोलिक रचणेनुसार सात विभागात सात टीम मध्ये “मी ही निसर्गदूत” या भावनेने काम करण्याचे योजले आहे.
निसर्गदूत फौंडेशन च्या माध्यमातून पर्यावरण पूरक काम करण्यासाठी सुहास वायंगणकर, बाचुळकर सर, अनिल चौगुले, उदय गायकवाड, देवलापूरकर सर, अमोल बुड्ढे आशा पर्यावरण, वृक्ष, निसर्ग अभ्यासक अशा अभ्यासू लोकांच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे.
तसेच निसर्गदूत फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २४ मार्च २०२१ रोजी भालचंद्र चिकोडे ग्रंथालया शेजारील बागेचे सुशोभीकरण करून संस्थेच्या कामाची सुरवात करण्यात येणार आहे. यावेळी अनिल चौगुले (निसर्ग मित्र) चंदन मिरजकर, प्रमोद पाटील, योगेश चीकोडे, जयदीप मोरे, सचिन साळोखे, शंतनु मोहिते, अक्षय निरोखेकर, सिद्धेश्वर पिसे, कृष्णात आतवाडकर, विजय पाटील, भार्गव परांजपे, सुमित पाटील हे उपस्तीत होते.