Share Now
Read Time:59 Second
दरवर्षीप्रमाणे शहरात मोठया प्रमाणात होळी पोर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पोर्णिमा रविवार, दि. 28 मार्च 2021 रोजी येत आहे. ही होळी पोर्णिमा पर्यावरणपुरक साजरी करावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरवासीयांना केले आहे.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी होळीचा सण आनंदाने साजरा करुन पर्यावरणाचे संरक्षण करा. यामध्ये होळी लहान करुन आपले डांबरी रस्ते खराब होणार नाहीत याची दक्षता घ्या. तसेच होळी लहान करुन वाचलेल्या शेणी महापालिकेच्या स्मशानभुमीस दान करा असे आवाहन केले आहे. यासाठी या फोन नंबर 231-2540436, 254029 संपर्क साधावा.
Share Now