विशेष वृत्त जावेद देवडी
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३/७/२०२१
दिनांक२४/५/२०२१ रोजी ऋशीकेश पार्क, पाचगाव येथील इसम नामे सात्ताप्पा पाटील यांनी अमेझॉन वरुन खरेदी केली होती. त्या खरेदीवर कॅशबॅक आली असुन ती रिफंड करायची आहे अश्या बहान्याने पाटील यांना एका अनोळखी इसमाने मोबाइल द्वारे संपर्क केला. कॅश बॅक आली आहे असा त्यासाठी आपल्या बॅंक डिटेल्सची आवश्यकता आहे अशा भुलथापा मारत हिंदी मधून बोलणार्य़ा इसमाने, अर्जदार पाटील यांचे कडून त्यांच्या बॅक डिटेल्स व ओ.टी.पी. याबाबतची माहिती घेतली. पाटील यांनी अमेझॉन वरुन पार्सल मागिवले असल्याने त्याना त्याचे सांगणेवर विश्वास बसला व समोरुन बोलणाऱ्या इसमास त्यांनी आपली बॅक डिटेल्स व ओ.टी.पी.माहिती देताच त्यांचे खात्यावर एकूण २,७५,०००/- इतकी रक्कम कमी झाली होती. झाले प्रकाराबाबत सात्ताप्पा पाटील यांनी तात्काळ शाहुपूरी पोलीस ठाणे गाठले व घडला प्रकर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीकृष्ण कटकधोंड याांना सांगून तक्रारी अर्ज दिला होता.
सदर अर्जाचा तपास पोलीस अमलदार दिग्विजय चौगले यांचेकडे देण्यात आला होता. पोलीस अमलदार चौगले यांनी अजर्दार यांचे कडून संपुर्ण प्रकार जाणून घेवून अजर्दार यांचे पासबूक व इतर माहिती प्राप्त केली सदरचे ट्रान्झाक्शन झालेल्या ठिकाणी तात्काळ पत्रव्यवहार केला. तसेच नॅशनल पेमेंट कार्पोरेशन (NPCI) व फ्लीपकार्ट पेमेंट यांचे मदतीने अजर्दार यांचे पेमेंट ज्या खात्यावर गेले होते ती खाती गोठवून त्यावरील रक्कम अबाधीत केल्या व संबधीत बॅंकेशी पत्रव्यवहार करुन सदरची रक्कम पुन्हा अर्जदार यांच्या खात्यावर जमा केली. पोलीस अमलदार दिग्विजय चौगले यांनी संबधीत बॅंक, मर्चंट यांचेशी तात्काळ पत्रव्यवहार करुन अर्जदार यांच्या अर्थिक नुकसानीस प्रतिबंध केला आहे.
याबाबत शाहुपूरी पोलीसांकडून नागरीकांना अवाहन करण्यात येते की,ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाणात वाढ झाली असुन नागरीकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीस मोबाईल द्वारे आपल्या बॅंकेच्या डिटेल्स तसेच ओ.टी.पी. बाबतची माहिती देवू नये.