न्यू शाहूपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊन च्या काळात रक्ताची तुटवडा लक्षात घेऊन न्यू शाहूपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन सासणे मैदान येथे करण्यात आले होते.

तत्पूर्वी नाईक यांनी तावडे हॉटेल कमानी जवळील गोरगरिबांना जेवण मास्क व सॅनिटायझर याचे वाटप केले. 

Advertisements

अनिस नाईक हे नेहमी सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय असतात याचबरोबर ते दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवितात आजही त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना जेवण वाटप केले व वैभविलक्ष्मी ब्लड बँक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास ५० मित्र रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी बँकेचे सर्वेश पाटील यांचे सहकार्य लाभले.
यावेळी वासिम मुजावर, अलबाज नाईक, माज सनदी, फैया ज स्वार, विवेक भोसले,योगेश पाटोळे, अबरार शहा, अबू जमादार, अरबाज मुल्ला, आरिफ आवटी, सुफियान मोमीन, नईम जमादार, सौरभ मधाळे आदी उपस्थित होते.अनिस नाईक यांना यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, माजी नगरसेवक निलेश देसाई,शादाब अत्तार आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *