युवा पत्रकार संघ, मुख्य कार्यालयास राज्य महीला पदाधिकार्यांची भेट व आवाहन…

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 36 Second

 

विशेष वृत्त:कोमल शिंगे

युवा पत्रकार संघ, मुख्य कार्यालयास राज्य महीला पदाधिकार्यांची भेट व आवाहन…

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या राज्य महिला अध्यक्षा सौ. अर्चना चव्हाण यांच्या सह महीला पदाधिकारी दिपाली मुराळी, अश्विनी जाधव, राधिका पाटील, अश्विनी स्वामी यांची पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालय ई. वार्ड ४६३ ख/२ शाहूपुरी शाहूरोड कोल्हापूर येथे भेट देऊन महा पुराने कार्यालयाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी महीला पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन कार्यालचे नुकसानीबाबत सविस्तर माहिती दिली, राज्यातील यूवा पत्रकार संघाचे पदाधिकारी मुख्य कार्यालयास भेट देत आहेत.

राज्य महिला आघाडीच्या वतीने
झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मदतीसाठी
आवाहन

कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी आणि आलेला महापूर ,,,त्यामुळे सर्वसामान्य रहीवाशांची झालेली दयनीय अवस्था आपण जाणताच .अनेक कुटुंबांचे संसार या महापुरात उध्वस्त झाले .कोल्हापूरातील श्रमिक पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या युवा पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयाला देखील याचा फटका बसला. युवा पत्रकार संघाचे कार्यालय जवळपास चार ते पाच दिवस (१५) पुट पुराच्या पाण्याने पुर्ण पणे पाण्याखाली होते . या काळात युवा पत्रकार संघाच्या कार्यालयातील फर्निचर खराब झाले संगणक खराब झाले .कॅमेरे, ड्रोन कॅमेरा , ट्रायपॉड, इलेक्ट्रॉनिक वस्तू, इलेक्ट्रिकल उपकरणे, युवा पत्रकार संघाच्या कागदपत्रांची कपाटे पुराच्या पाण्यात भिजून खराब झाली. या अस्मानी संकटात युवा पत्रकार संघाचे जवळपास साडे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा नव्याने कार्यालय सुसज्ज करण्यासाठी,
नुकसान भरून काढायला हवे .नवीन फर्निचर ,नवीन कॅमेरे, नवीन संगणक, नवी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करणे गरजेचे आहे. कारण श्रमिक पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या युवा पत्रकार संघाचे कार्यालय पुन्हा नव्या जोमाने सुसज्ज व्हायला हवे.

यासाठी सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था, पक्षाचे पदाधिकारी, लोक प्रतिनिधी, युवा पत्रकार संघाचे सदस्य व हितचिंतक यांनी आपल्या सक्रिय आर्थिक मदतीचा हात पुढे यावा, युवा पत्रकार संघाचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी सभासद व हीतचिंतक यांनी पुन्हा एकदा मुख्य कार्यालय उभारणी साठी पुढे यावे असे आवाहन राज्य महीला आघाडी पदाधिकारी यांच्या कडून आवाहन करण्यात येत आहे.
युवा पत्रकार संघाच्या कार्यालयासाठी मदतनिधी खाते कोल्हापूर युवा पत्रकार संघ कोल्हापूर, बँकेचे नाव , कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर, या बँकेच्या 021510005100008 या क्रमांकाच्या बँक खात्यावर आपला मदतनिधी जमा करावा ,ही विनंती ! बँकेचा IFSC CODE , IBKL 0463 KDC
असा आहे .
गुगल पे नंबर 78 75 70 77 78

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *