विशेष वृत्त मार्था भोसले
मा.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आगामी येणारा गणेश उत्सव हा सण शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून काढून त्यांच्याकडील हत्यारे व दारुगोळा जप्त करून सदर इसमांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.
मा.पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलिस पथके तयार करून माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस अमंलदार वैभव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार सुधीर उल्हास सातपुते रा. जवाहरनगर ,इचलकरंजी यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असून तोच त्याच्याकडील पिस्तूल विक्री करणेकरीता आज दि:०१/०९/२०२१ रोजी कबनूर ता.हातकणंगले येथील पंचगंगा सहकारी साखर कारखाने समोर असलेल्या रिकामे जागेतील पाण्याचे टाकी खाली येणार आहे अशा मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार ,तसेच पोलीस अंमलदार नेताजी डोंगरे, श्रीकांत मोहिते वैभव पाटील, उत्तम सडोलीकर यांनी कबनुर, ता. हातकणंगले येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्यासमोर असलेल्या रिकामे जागेतील पाण्याची टाकी जवळ जाऊन सापळा लावून सुधीर उल्हास सातपुते व.व.३९, रा.२१/२३२, स्टेशन रोड, संजय फॉन्ड्री समोर, जवाहरनगर, इचलकरंजी,ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यास त्याचे कब्जातील ५०,०००/-रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे ०१ पिस्तूल व २००/- रुपये किंमतीचा ०१ जिवंत राऊंड असे एकूण ५०,२०० रुपये किंमतीच्या मुद्देमालासह पकडले आहे. सदर आरोपी विरुद्ध शिवाजीनगर व चंदगड पोलीस ठाणे येथे गंभीर दुखापत ,खून, खुनाचा प्रयत्न व जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सहा.पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, किरण भोसले ,पोलीस अंमलदार नेताजी डोंगरे, श्रीकांत मोहिते, वैभव पाटील ,उत्तम सडोलीकर, प्रदीप पवार, संजय पडवळ, संतोष पाटील, रफिक आवळकर, तसेच सायबर पोलीस ठाणेकडील अमर वासुदेव यांनी केले आहे.