कोल्हापूर / प्रतिनिधी : सध्या फक्त व्यावसायाभिमुख इंजिनीअरिंग, फार्मसी, मेडिकल अभ्यासक्रमांमध्येच इंटर्नशिपची उपलब्धता आहे, परंतू बी. ए., बी. कॉम., बी. एससी. अभ्यासक्रमांमध्ये त्याची अद्याप समाविष्टता नाही आहे. कोविड महामारीमुळे मागील दोनही वर्ष सदर अभ्यासक्रमतील मुले नोकरी विना घरीच असल्याचे प्रखरतेने जाणवते यासाठीच आम्ही सिद्धम इंनोव्हेशन व बिझिनेस इनक्युबेशन सेंटरद्वारे सिबिक इंटर्नशिप २०२१ हा नियोक्त्याद्वारे ऑफर केलेला एक “मॉडल उपक्रम” देत आहोत, जो संभाव्य बी. ए,, बी. कॉम,, बी.एस.सी,, डिप्लोमा व आय. टी. आय पास आउट विध्यार्थ्यांना उद्योग जगतातील कामाचा अनुभव प्रदान करेल.
जे आमच्याशी संलग्न १५ SKP (स्किल नॉलेज प्रोव्हायडर) अंर्तगत कंपनीमध्ये सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत नोकरीवर किंवा संशोधनाचा व्यावहारिक अनुभव मिळविण्यासाठी वर्क फ्रॉम होम अथवा व्यक्तिशः काम उपलब्ध करून देणार आहे.
फायदे –
१. इंटर्नला दरमहा रु. ४०००/- ते १००००/- स्टायपेंड दिले जाईल ज्या अन्वये ते महाराष्ट्र शासनमान्य, MSBTE संलग्न व्यावसायभिमुख कोर्सेस पूर्ण शकतात.
२. प्रमाणपत्र : इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्याद्वारे जारी केले जाईल.
३. तत्काळ व्यावसायाभिमुख कोर्स व इंटर्नशिप मुळे चांगल्या पगाराची नोकरी अथवा व्यवसाय चालू करण्याची संधी एकाच वर्षात मिळणार आहे.
४. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सर्व ओरिजिनल कागदपत्रांसह भेटण्याची अंतिम तारीख २०-१२-२०२१.
सिध्दम इनोव्हेशन व बिझनेस इन्क्युबेशन सेंटर, संचलित सिबीक इन्स्टिट्युट ऑफ टेकनॉलॉजी, कोल्हापूर ही महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई संलग्नित व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ६ महिन्यांच्या इंटर्नशिप सह एक वर्षाच्या कालावधीचे अनुक्रमे १२ वी पास विद्यार्थांकरीता डिप्लोमा इन सप्लायचेन मॅनेजमेंट व लॉजिस्टीक, तसेच बारावी, आय. टी. आय., डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या विद्यार्थांकरीता डिप्लोमा इन मेडीकल इक्वीपमेंट मेंन्टेनंन्स व ॲडव्हान्सड् डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्स तसेच बी. एस. सी., बी. फार्म., बी. ए. एम्. एस्., बी, एच्. एम्. एस्. विद्यार्थांकरीता आरोग्य विभागाशी निगडीत ॲडव्हान्सड् डिप्लोमा इन मेडीकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हे व्यावसायाभिमुख प्रत्येकी ६० जागेसह वार्षिक फि रू. २५,०००/- ते ३०,०००/- प्रमाणे प्रथमच उपलब्ध झाले आहेत.
यासाठी दुस-या मजल्यावर अद्यावत डायग्नोस्टीक सेंटर, आरोग्याशी निगडीत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासाठी कॉल सेंटर व क्वालिटास कंपनीच्या संयुक्त विद्यमाने IoT साठी अद्यावत एक्सलेन्स सेंटर उभारण्यात येत आहे.
संपर्क :- सिद्धम इंनोव्हेशन व बिझिनेस इनक्युबेशन सेंटर,
पत्ता :- कैलाश टॉवर, ४ था मजला, बी न्यूज ऑफिस वर, स्टेशन रोड कॉर्नर, कोल्हापूर
फोन :- ७२६३९५१८३७, ७२६४९५१८३७, ९७६७१९९२९९
आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू युवकांसाठी नामी संधी असून त्यांना अवगत करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.
तरी सर्व गरजू युवकांनी संस्थेशी दि. २० डिसेंबर २०२१ पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी केले.
यावेळी पारस ओसवाल, रमेश कार्वेकर, सचिन कुंभोजे, सुर्यकांत दोडमिसे व प्रतिक ओसवाल सह सर्व संचालक, प्राचार्य रविंद्र वागवेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.