Share Now
Read Time:1 Minute, 2 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती महेश रामचंद्र गायकवाड (वय ५०) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले साळोखेनगर प्रभागातून २००५ ते २०१० या कालावधीत ते नगरसेवक होते, मोरे-माने नगर व साळोखेनगर प्रभागात हनुमान मंदिर उभारणी सह आपल्यांना नगरसेवक कारर्दीत अनेक विकास कामे त्यांनी केली होती त्यांनी काही काळ पत्रकारितेतही आपले योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात वडील पत्नी दोन मुले विवाहित कन्या भाऊ असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन ३ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पंचगंगा स्मशानभूमीत होणार आहे.
Share Now
भावपूर्ण श्रध्दांजंली