सिंधुताई संपकाळ यांचे पुण्यात निधन युवा पत्रकार संघाला दिलेला शब्द अपूर्णच….

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताई सपकाळ ७३ वर्षांच्या होत्या, रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. 

महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता, तर २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

काही महिन्यापूर्वी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी महिला राज्य कार्याध्यक्ष अस्मिता जाधव पुणे जिल्हाध्यक्ष संतोष सावंत, संतोष भोस्कर , यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना २०२१ शासनाकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल युवा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला होता, त्यांनी त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रभर युवा पत्रकार संघ सामाजिक कार्य राबवत असल्याबद्दल संघाचे कार्याबद्दल कौतुक करून तुमच्या पुढील कार्यक्रमाला मी उपस्थित राहीन असे पदाधिकारी यांना बोलल्या होत्या पण आज मात्र त्यांचे प्रदीर्घ आजारामुळे यांचे दुःखद निधन झाले समाजामध्ये अशी व्यक्ती पुन्हा होणार नाही युवा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सभासद त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *