Share Now
Read Time:1 Minute, 16 Second
Media Control News Network : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारी मध्यानापर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे यंदा राज्यात गुलाबी थंडीचं जरा उशिराच आगमन झालं. पण आता ही थंडी २० फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव पुढचे दोन महिने तुम्हाला घेता येणार आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीचा जोर आणखी वाढणार आहे. वाढती थंडी सद्या गहू, हरभरा, पाजीपाला अन्य पिकांना वरदानकारक ठरत आहे. वाढत्या थंडीचा फायदा होणार असल्याचं एकंदरीत शेतकऱ्यांचे मत आहे.
Share Now