मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पण काळजीचं काही कारण नसल्यांच त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनंही त्यांनी केलं आहे.
पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. डॉक्टरांनी सूचवल्याप्रमाणं मी उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले असतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी”
दरम्यान, साधारण महिन्याभरापूर्वी २९ डिसेंबर २०२१ रोजी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.