जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात, विधी साक्षरता शिबिर पार पडले…!

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 19 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात, शाहू हॉल मध्ये विधी साक्षरता शिबिर अंतर्गत व्यावहारिक प्रकरणामधील दाखल दाखलपूर्व मध्यस्थी बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रास्ताविक करताना मा.श्री.पंकज देशपांडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी उपस्थित विधी विभागाचे विद्यार्थी तथा वकील यांनी पर्यायी वाद निवारण ऐवजी अतिरिक्त वाद निवारण असे संबोधले जावुन मध्यस्थी मध्ये करीअर निवडून स्वतः ची ओळख निर्माण करा असे मार्गदर्शन केले.यावेळी Alternative dispute resolution आणि pre Institution Mediation and Settlement in commercial dispute या पुस्तकाचे मा.श्री.प्रा.श्रीपाद देसाई शहाजी लॉ कॉलेज आणि मा.श्री.प्रा.विवेक धुपदाळे विधी विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.श्री.देसाईसर यांनी वैकल्पिक वाद निवारण या विषयावर मार्गदर्शन केले.श्री.धुपदाळेसर यांनी दाखलपूर्व प्रकरणामधील मध्यस्थी या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच,प्रा.इरळे सर यांनी लिहिलेल्या Law of Social

Transformation या पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मा.श्री.विवेकानंद घाटगे, सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी मनोगत व्यक्त करताना प्रकरणांमध्ये मध्यस्थी करताना वकीलांची भुमिका कशा पद्धतीने बजावली पाहिजे या बाबत मार्गदर्शन केले.मा.श्री.गिरीश खडके, अध्यक्ष जिल्हा बार असोसिएशन, कोल्हापूर यांनी वैकल्पिक वाद निवारण बाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा.श्रीमती सुरेखा पाटील, जिल्हा न्यायाधीश १, कोल्हापूर यांनी दाखलपूर्व प्रकरणामधील माहिती सविस्तर देताना न्यायालयातील वाद तडजोड आणि आपापसात मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रकारे मनोगत व्यक्त केले.सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मा.श्री.राजीव माने,सहा.अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी केले यावेळी शिक्षक, विद्यार्थी, वकील,कर्मचारी तथा प्राधिकरणाचे कर्मचारी असे एकूण २०० जणांनी सहभाग घेतला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *