मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक : श्रीकांत देशपांडे

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 29 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २२:  चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक जाहीर  झाली आहे. या पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साथ देवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजर्षि शाहूजी सभागृहात श्री. देशपांडे  यांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, प्रांताधिकारी अमित माळी आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे पुढे म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी जास्तीत-जास्त असिस्टंटची (B.L.A.) नियुक्ती करावी. तसेच आदर्श आचारसंहितेच्या पालनाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. प्रशासनाने B L O ची संख्या वाढवावी, असे निर्देश देवून ते म्हणाले, निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून ‘सी व्हीजल ॲप’ बनविले आहे. याचा वापर पदाधिकाऱ्यांनी करावा. त्याचबरोबर मतदात्यांनी ‘वोटर्स हेल्पलाईन ॲप’ चा वापर करुन आपले नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३११ मूळ व ४७ सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी एकूण ३५८ मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात ११ हजार वरिष्ठ मतदार (सिनिअर सिटीझन) आहेत तर 249 दिव्यांग मतदार असल्याची माहिती देवून या निवडणुकीत मतदात्यांनी कोविडच्या नियमांचे पालन करून मतदान टक्केवारी वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

तर मतदात्यांनी या निवडणुकीसाठी पॅन/आधार कार्ड, मनरेगा सेवा पत्र, बँक/पोस्ट ऑफीसचे छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा योजनापत्र (हेल्थ स्मार्ट कार्ड), लायसन्स, पासपोर्ट, छायाचित्रासह निवृत्तपत्र, केंद्र, राज्य, निम्न शासकीय कर्मचारी ओळखपत्र, केंद्र सरकारचे दिव्यांग ओळखपत्र, संसद, विधानसभा/परिषद सदस्यांचे कार्यालयीन ओळखपत्र अशा एकूण १२ विविध बाबींचा मतदान छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त ओळखीचा पुरावा म्हणून मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.

या बैठकीसाठी इंडियन नॅशनल कॉग्रेसचे संजय पोवार (वाईकर), बंडोपंत मालप,  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सुनिल देसाई, भाजपाचे चंद्रकांत घाटगे, बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे, माकपचे शंकर काटाळे, लोकराज्य जनता पार्टीचे शशिकांत जाधव व आम आदमी पक्षाचे अभिजीत कांबळे आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *