मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॉ. कोल्हे विजयी तर, शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील पराभूत झाले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी घोषित केल्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी मत व्यक्त केले. यावेळी एकच घोषणा देण्यात आली. अमोल कोल्हेंचा विजय असो, राष्ट्रवादीचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. तसेच अमोल कोल्हेचा विजय असो, श्रीरंग बारणेंचा विजय असो, एकच वादा अमोल दादा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या, अशा घोषणानी बालेवाडी परिसर दुमदुमला.
चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना उमेदवार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी क्लीन बोल्ड केले. डॉ. कोल्हे यांनी आढळरावांचा धक्कादायक पराभव केला.

आढळराव पाटील मागील 15 वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत होते. माजी शिवसैनिक आणि अभिनेते असलेल्या कोल्हे यांनी आढळरावांना चितपट करत पहिला मराठी अभिनेता खासदार होण्याचा बहुमान डॉ. कोल्हे यांनी मिळवला.