Kolhapur : युवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन खासदार संजय मंडलिक यांचे अभिनंदन

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 19 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आज मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाला. यात संजय मंडलिक यांनी आघाडी घेत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा पराभव करीत विजयी झाले. यावेळी युवा पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक-अध्यक्ष व मिडिया कंट्रोल न्यूज चॅनलचे संचालक शिवाजी शिंगे यांनी नूतन खासदार संजय मंडलिक यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम रमणमळा येथे तर हातकणांगले मतदारसंघाची मतमोजणी शासकीय गोदाम सरनोबतवाडी येथे सकाळी 8 पासून सुरू झाली. केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य पोलीस दल, राज्य राखीव दल, केंद्रीय पोलीस दल अशी तिहेरी व्यवस्था मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर पर्यंत ठेवली होती.

संजय मंडलिक व धनंजय महाडिक यांच्यात अटीतटीची लढत होती. मात्र पहिल्या फेरीपासून संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांच्यावर मोठ्या आघाडी घेतली. त्यांनी पहिल्या फेरीतच 19683 मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत आघाडी 34624 मतांनी मात केली. तिसऱ्या फेरीत 52135 मतांनी तर चौथ्या फेरीत शिवसेना उमेदवारांचे मताधिक्य वाढत राहिले. चौथ्या फेरीत मंडलिकांना 66981 मतांची आघाडी मिळाली पाचव्या फेरीत 83930 मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर संजय मंडलिक यांनी आघाडी घेत विजयाचा गुलाल उधळला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *