Share Now
Read Time:1 Minute, 10 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी :
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मत मोजणीला दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता सुरूवात होणार आहे.
एकुण १५ उमेदवार रिंगणात उतरले असले तरी मुख्य निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजीत कदम यांच्यात प्रमुख यांच्यात असणार आहे. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी ही पोट निवडणूक कोणाला आमदार बनवणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापुरची जनता कोणाची साथ देणार, कोणाला निवडून देणार? याची संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे त्यामुळे उद्याच्या निकालाची प्रतीक्षा सर्व प्रमुख पक्ष तसेच जनता यांना लागली आहे.
Share Now