पालकमंत्री सतेज पाटील व कोल्हापूर दक्षिण चे लोकप्रिय आमदार ऋतुराज पाटील यांच्या कडून प्रज्वलचा विशेष गौरव करण्यात आला…..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : 

जगात भारी, आम्ही कोल्हापुरी 

Advertisements

नुकताचं अ‍ॅपलने ‘अ‍ॅपल शॉट ऑन आयफोन मॅक्रो चॅलेंज’ (Apple shot on iPhone micro challange) मधील सर्वोत्तम फोटोंचे अनावरण केले आहे. यामध्ये जगभरातून असंख्य फोटो आले होते. यातील १० फोटोंची निवड करण्यात आली होती. या १० फोटोंमध्ये कोल्हापुरातील हौशी फोटोेग्राफर असलेल्या प्रज्ज्वल फोटोचा समावेश केला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतातून निवड होणारा प्रज्ज्वल हा एकमेव आहे.

ऍपल कंपनीने आयोजित केलेल्या ‘शॉट ऑन आयफोन’ या फोटोग्राफी स्पर्धेत कोल्हापूरच्या प्रज्वल चौघुले यांचा जगातील टॉप टेनमध्ये सामावेश झाला आहे. चीन, हंगेरी, इटली,स्पेन,थायलंड आणि अमेरिका या देशांतील इतर नऊ विजेत्यांमध्ये भारत देशातून कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुलेच्या समावेश झाला आहे. 

प्रज्वल यांनी शिवाजी विद्यापीठ येथे काढलेल्या कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूचा फोटो काढला जगभरात चर्चिला जात आहे. प्रज्वल यांना एका ठिकाणी कोळ्याच्या जाळ्यावर दवबिंदू पडल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या आयफोन १३ प्रो मध्ये तो फोटो टिपला. हा फोटो निसर्गाचं एक विशेष रुप दाखवतो.

कोल्हापूर चे पालकमंत्री सतेज पाटील व कोल्हापूर दक्षिण चे लोकप्रिय आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रज्वल च्या यशा बद्दल त्याचा विशेष गौरव केला.

प्रज्वलने कोल्हापूरचे नाव आपण जगात नेले असून आम्हां कोल्हापूरकरवासीयांना त्याचा अभिमान आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे संपुर्ण कोल्हापूर तर्फे अभिनंदन आणि आपल्या पुढील शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *