Share Now
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी : झुंजार क्लब आयोजित टी एम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेस छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरुवात झाली.
स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सत्यजित कदम विश्वराज महाडिक पृथ्वीराज कृष्णराज महाडिक माजी नगरसेवक विलास वास्कर, तुम्हाला राजसिंह शेळके, विलास वास्कर, विजय खाडे-पाटील, किरण नकाते रूपराणी निकम, सीमा कदम, उमा इंगळे, वैभव माने,उत्तम शेटके, इंद्रजीत जाधव आदी उपस्थित होते.
उद्घाटनाचा पहिला सामना संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्या खेळविण्यात आला. संपूर्ण सामन्यात बुधवार पेठ चे वर्चस्व राहिले त्यांनी हा सामना ४-१ अशा गोलफरकाने जिंकुन पुढील फेरीत प्रवेश केला. पराभूत संघ ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांना धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या कडून दहा हजार रुपये प्रोस्ताहनपर बक्षीस देण्यात आले.
Share Now