विशेष वृत्त तुकाराम कदम
सांगली/प्रतिनिधी : राज रत्न युथ फाऊंडेशन यांच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या थाटामाटात व अगदी जल्लोषात साजरी या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मा सांगली उपअधीक्षक अजित टिके साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
प्रतिमापूजन माजी सभापती विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय विशाल दादा पाटील काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील प्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री सतीश शेठ मालू मिरज उप अधीक्षक अशोक विरकर साहेब संजय नगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक शिरसागर साहेब हुसेन बेपारी अविनाश पाटील.
जयंतीनिमित्त वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व रक्तदान शिबिर व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला यावेळी सर्व उपस्थित मान्यवर यांनी राज रत्न युथ फाऊंडेशन माधवनगर यांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यांच्यातर्फे राज रत्न युथ फाऊंडेशन रविवार पेठ माधवनगर यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले