क्राईम रिपोर्टर मार्था भोसले
कोल्हापूर/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची कारवाई. मा.पोलीस अधीक्षक सो, श्री.शैलेश बलकवडे सो यांनी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील जोतीबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा दोन वर्षानंतर होत असलेने सदर यात्रेस भरपूर प्रमाणात गर्दीहो णार असलेने यात्रेस येणारे सर्व भाविकांना सुरळीतपणे दर्शन व्हावे व कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये म्हणून सुरक्षेचे दृष्टीकोनातून नियोजनबध्द बंदोबस्त नेमला आहे.
तसेच येणारे भाविकांच्या मौल्यवान चिजवस्तूंचे सुरक्षीततेकरीता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नयेया,करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील साध्या वेषात पथकाची नियुक्ती केली होती.
मा, पोलीस अधीक्षक सो यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी श्री जोतीबा देवाचे यात्रेकरीता नेमलेले,पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे श्री जोतीबा यात्रा चालू असताना काही अनुचित प्रकार घडू नये याकरीता मंदीर परीसरात साध्या वेषातील पोलीस पथकाने सक्त पेट्रोलींग करीत असताना यात्रेत दर्शनाकरीता,आलेले भाविकांचे गर्दीत घुसून चोरी करणारे तसेच चोरी करणेकरीता संशयीतरित्या फिरतअसणारे ०१.एकनाथ महादेव मासाळकर, व.व.४१. रा.विद्यानगर, ता.पाथार्डी, जि.अहमदनगर,०२.उमेश चंदू पवार, व.व.४८, रा.बुध्दविहार हॉलजवळ, करोडी, ता.जि.औरंगाबाद, ०३.संतोष शंकर चव्हाण, व.व.२९, रा.सुमित्रा कॉलनी, वेळापूर, ता.माळशिरस, जि.सोलापूर, ०४.नितीन अंकुश गायकवाड, व.व.२४, रा.सुभाष कॉलनी, ता.जि.बीड, ०५.योगेश प्रकाश तांदळे, व.व.२९. रा.माऊलीनगर, ता.जि.बीड, ०६.दत्ता मोहन काळे, व.व.४२, रा.घर नं.२३४. हुडगी रोड, भारतमाता नगर,ता.जि.सोलापूर, ०७.आदेश कानू उर्फ संतोष पवार, व.व.२९, रा.खोकरगाव, ता.श्रीरामपुर,जि.अहमदनगर यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांचेकडून तीन सोन्याची मणीमंगळसूत्र एकूण १२ ग्रॅम वजनाची व एक मोबाईल हँन्डसेट असा एकूण ७५,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. सदर आरोपीत यांना पुढील कारवाई करीता कोडोली पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक .शैलेश बलकवडे;, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोलीस निरीक्षक . संजय गोर्ले,
सपोनि. कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे, पोलीस अमलदार नेताजी डोंगरे,सुनिल कवळेकर, खंडू कोळी, अजय वाडेकर, संजय पडवळ, अमोल कोळेकर, महेश गवळी,संतोष पाटील, ओंकार परब, वैभव पाटील, अमर शिरढोणे, सुरज चव्हाण यांनी केली आहे.