कोल्हापूर/प्रतिनिधी : सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनम विक्रीमध्ये ११७ वर्षांची यशस्वी परंपरा असलेले आणि नेहमी नावीन्यपूर्ण कल्पनानी बाजारात आपला वेगळा ठसा निर्माण करणारे नामांकित महेंद्र ज्वेलर्स यांनी आधुनिकतेला जोड देत नवीन मोबाईल ॲप नुकताच लॉंच केला.घर बसल्या कोठूनही देश आणि विदेशातूनही या ॲपवरून सोने चांदी खरेदी होणार आहे. कोल्हापूर च्या नूतन आमदार जयश्रीताई जाधव यांच्या हस्ते नुकतेच या चे उद्घाटन करण्यात आले.घर बसल्या सोने खरेदी करण्यासाठी देश-विदेशातील नागरिकांना हे ॲप उपयुक्त असल्याचे भरत ओसवाल यांनी सांगितले
सोने चांदी आदी व्यवसायात एक वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या महेंद्र ज्वेलर्स यांनी ही नाविन्यपूर्ण कल्पना मांडून कशा पद्धतीचे ॲप बाजारात आणले आहे या नाविन्यपूर्ण प्रयोगाला आमदार जयश्री जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.तर चंद्रकांत ओसवाल यांनी पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिलेच ऍप असल्याचे सांगितले. यावेळी कॉलिंग कोल्हापूरचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक ईश्वर परमार,मेहुल ओसवाल,कुशल ओसवाल, प्रशांत कोतमिरे, रवी आंबेकर आदी उपस्थित होते.