Share Now
कोल्हापूर प्रतिनिधी, दि.१३ :
कागलमध्ये हरिनामाच्या गजरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भक्तिभावाने रंगले. येथील श्रीमंत यशवंतराव घाटगे वाड्याच्या मैदानात आयोजित हरिनाम सप्ताहात विठोबा-रखुमाईच्या तालावर टाळ वाजवत ते तल्लीन झाले. हसन मुश्रीफ यांच्या या सहभागाने उपस्थित वारकरीही भारावले. सकाळी साडेदहाची वेळ. घरातून बाहेर पडल्यानंतर नेहमीप्रमाणे गहिनीनाथ गैबीपीराचे दर्शन घेतल्यानंतर जवळच असलेल्या हरिनाम सप्ताहाकडे मंत्री मुश्रीफ वळले.
विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनानंतर विण्याचे दर्शन घेतले. त्या गर्दीतच एका वारकऱ्यांने मंत्री हसन मुश्रीफांच्या गळ्यात टाळ अडकविला. टाळ-मृदंगासह विठोबा- रखुमाईच्या गजरात तल्लीन झालेल्या मुश्रीफांनी आपोआपच ठेका धरला. त्यानंतर सप्ताहानिमित्त तयार केलेल्या प्रसादाचाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी आस्वाद घेतला.
Share Now