महाराष्ट्र व गोवा बनावटी दारुच्या मालाची बेकायदेशीर वाहुतक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई…!

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 31 Second

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, यांनी अवैध व्यवसायाचे उच्चाटन करणेच्या अनुषंगाने पोलीस दलाससुचना दिलेल्या आहेत. त्या प्रमाणे कोल्हापूर जिल्हामध्ये अवैध व्यवसायावर धाडत्र सुरु आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना दिनांक १७/०५/२०२२ रोजी त्यांचे बातमीदारा कडुन गोवा बनावटीची दारु, महाराष्ट्र राज्यामध्ये वाहतुकीस अथवा विक्री करण्यास बंदी असुनही एम जी हेक्टर गाडी नं. एम एच ०९ – एफ जे – ५४९९ या अलिशान कारमधून कागल येथे येणार असलेची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांनी त्यांचे कार्यालयाकडील पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार राजीव शिंदे, शिवाजी जामदार,चंदू नन्नवरे, उत्तम सडोलीकर अनिल पास्ते यांचेसह मिळाले बातमी प्रमाणे कागल पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये सापळा लावला असता सदरची एम जी हेक्टर कार ही कागल एस.टी. स्टॅन्ड जवळून सहीस रोडने आली असता ती आडवुन बाजुला घेणेस सांगितले असता गाडी बाजूला घेत असताना त्यामधील एक इसम गाडीतून उतरुन पळून गेला. त्यावरील चालक स्वप्निल चंद्रकांत कांबळे वय २६ रा.इंदीरानगर , कसबा सांगाव ता.कागल जि.कोल्हापूर यास ताबेत घेवून सदरची गाडी चेक केली असता त्यामध्ये महाराष्ट्र व गोवा बनावटीची वेगवेगळया कपंनीची विदेशी दारु व बिअर बॉक्स असे एकूण १९,३४०/- रुपये किमंतीची दारु मिळून आली त्याचा सविस्तर पंचनामा करुन वाहतूक करत असलेली एम जी हेक्टर गाडी नं. एम एच ०९ एफ जे – ५४९९ या गाडीसह एकूण १९,६९,३४०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदरची गाडी व गाडीतील विदेशी दारु ही पळूनगेलेल्या संजय गजानन फराकटे रा.कागल याची असलेने त्या दोघांचे विरुध्द कागल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाईही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिकगुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार राजीव शिंदे, शिवाजी जामदार, चंदू नन्नवरे, उत्तम सडोलीकर, अनिल पास्ते, सुकुमार हासूरकर व रफिक आवळकर यानी केलेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *