Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी :सकाळच्या सत्रातील पहिला सामना तडाका तालीम विरुद्ध शिवतेज किंग्स या दोन्ही संघांमध्ये झाला. सामना सुरू होताच पहिल्या पाच मिनिटांमध्ये शिवतेज किंगच्या सुरज काळे यांनी मैदानी गोल करून सुरुवातीस आघाडी घेतली. तडाका तालीम वर गोल झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरशीचा सामना सुरू झाला दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण गोल होऊ शकला नाही. उत्तरार्धामध्ये ४५ व्या मिनिटास संघास पेनल्टी कॉर्नर मिळाला त्याचा फायदा घेऊन प्रमोद काळे यांनी अप्रतिम गोल करून संघास २ विरुद्ध ० अशी आघाडी मिळवून दिली. शिवतेज किंगचा पेनल्टी कॉर्नरवर गोल संपताच काऊंटर अटॅक वर पेनल्टी कॉर्नर मिळाला व त्याचे अचूक गोलमध्ये विनायक नेरकर यांनी रूपांतर व्या मिनिटास शिवतेज किंगच्या सुरज काळे यांनी आपला वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल करून संघास निर्णायक आघाडी घेऊन शिवतेज किंग्स या संघाने हा सामना तीन विरुद्ध एक गोलने जिंकला
सकाळच्या सत्रातील दुसरा सामना पद्मा पथक विरुद्ध श्री साई मराठा यांच्यात झाला. सामन्याच्या सातव्या मिनिटात श्री साई मराठा या संघाच्या रामचंद्र पाटील यांनी पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल नोंदविला. श्री साई मराठा या संघाची आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही सामन्याच्या नवव्या मिनिटास पद्मा पथक च्या ओमकार निकम यांनी पेनल्टी कॉर्नरवर संघाचा पहिला गोल नोंदवून १-१ अशी बरोबरी व्या मिनिटास पद्मा पथक च्या विनोद मनुगडे यांनी २३ व्या मिनिटास मैदानी गोल करून संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ४८ व्या मिनिटाला पद्मा पथकच्या आकाश उडाळे यांनी सं घाचा तिसरा गोल करून संघास भक्कम अशी आघाडी मिळवून दिली. पद्मा पथक च्या दिग्विजय कळसे यांनी ५३ व्या मिनिटास मैदानी गोल करून संघाच्या आघाडीत भर केली. ५७ व्या मिनिटास श्री साई मराठाच्या रामचंद्र पाटील यांनी वैयक्तिक दुसरा व संघाचा दुसरा गोल करून आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. साई मराठा या संघाचा आघाडी कमी करण्याचा प्रयत्न फार काळ टिकवता आला नाही.पद्मा पथक च्या दिग्विजय कळसे यांनी वैयक्तिक दुसरा व संघाचा पाचवा गोल करून निर्णायक आघाडी देऊन पद्मा पथक संघाचां विजय निश्चित केला.
दुपारच्या सत्रातील सामना छावा पँथर्स विरुद्ध टीपीसी आरजीएफ यांच्यात अतिशय चुरशीचा झाला सामनाच्या पूर्वार्धात छावा च्या मुकुंद रजपूत यांनी पेनल्टी कॉर्नरवर ६ व्या मिनिटास अप्रतिम गोल करून संघास आघाडी मिळवून दिली. टीपीसी आरजीएफ संघाच्या विठ्ठल तेली यांनी सामन्याच्या १३ व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर गोल करून १-१ बरोबरी केली. सामन्याच्या १४ व्या मिनिटास छ. पॅंथरच्या शुभम जाधव (डॅनी)याने न भूतो न भविष्यती असा मैदानी गोल करून संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली.२४ व्या मिनिटास टीपीसी आरजीएफ संघाच्या सनी मोरे याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन संघास २-२ अशा बरोबरीत आणले. ४१ व्या मिनिटाला छावा पॅंथरच्या उदय कुरणे याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघास ३२ अशी आघाडी मिळवून दिली. छावाच्या शुभम जाधव यांने वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल करून ४-२ अशी आघाडी संघास मिळवून दिली. टीपीसी आरजीएफ च्या सत्यजित सावंत यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाचे आघाडी ४-३ अशी कमी केली. ५३ व्या मिनिटास टीपी सीआरपीएफ संघाच्या सत्यजित सावंत यांनी पेनल्टी कॉर्नर वर उत्कृष्ट असा गोल करून सामना ४-४ बरोबरीत आणला. सामना रंगतदार चालू असताना छावाच्या उदय कुरणे यांनी वैयक्तिक दुसरा व संघाचा पाचवा गोल करून संघास ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. टीपीसी आर जी एफ या आघाडी कमी करता न आल्यामुळे सदर चा सामना हा छावा पॅंथर यांनी जिंकला.
स्पर्धेत पंच म्हणून स्टॅनली डिसोजा(टी डी) धरण तंबा, शिवाजी डूबल, मनोज ईनानी,योगेश देशपांडे,संतोष चौगुले,कपिल मोरे, संजय डोंगरे,निसार म्हालदार हे काम पाहत आहेत.