सुप्रसिध्द सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दिलखूलास गप्पा….

कोल्हापूर/प्रतिनिधी :सुप्रसिध्द सिनेअभिनेते व जेष्ठ सामाजिककार्यकर्ते नाना पाटेकर कोल्हापूरात आल्याचे समजताच मंत्री हसन मुश्रीफ कागलवरुन कोल्हापूरला आले. नाना ज्या हाँटेलात थांबले आहेत, त्याठिकाणी जाऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले. हसन मुश्रीफ भेटण्यासाठी येत असल्याचे समजताच दस्तूरखुद्द नानाच त्यांच्या स्वागतासाठी खोलीच्या बाहेर लॉबीत येवून उभे होते. मुश्रीफ समोर येताच नानांनी त्यांना मिठी मारली.

यावेळी नाना पाटेकर म्हणाले, “अरे तु इकडे कशाला आलास.. मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो.” यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “असं नाही…. पाहूण्यांचं स्वागत व आदरातिथ्य करणं ही आमची कोल्हापूरचे संस्कार आहेत.” यावेळी नाना आणि हसन मुश्रीफ यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्या.

Advertisements

हसन माझा जवळचा दोस्त…..

यावेळी हसन मुश्रीफ यांचा नानांनी केलेला एकेरी उल्लेख ऐकून सोबत असलेले व्ही. बी. पाटील, राजेश लाटकर व उपस्थित सर्वजन क्षणभर थबकलेचं, त्यावेळी नाना म्हणाले, हसन माझा जवळचा दोस्त आहे रे… गैरसमज करून घेऊ नका, तसेच काही दिवसांपुर्वी मुंबईत रस्त्यातून जातानाच मला हसन दिसला, मी हसन…. हसन… म्हणत.. म्हणत गाडी दुसऱ्याला धडकली, असा किस्साही नानांनी यावेळी सांगीतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *