केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांची ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांना भेट…!

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 48 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : रेल्वे व वस्त्रउद्योग केंद्रीय राज्यमंत्री  दर्शना जरदोश यांनी महापालिकेच्या कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांना भेटी दिल्या. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, सचिव पृथ्वीराज भाटी, प्रांताधिकारी प्रकाश कदम, कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर, युवराज जबडे उपस्थित होते.

 सुरवातीला कसबा बावडा येथील एसटीपी प्लॅन्टला भेट देऊन कार्यान्वीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची कार्यप्रणाली समजावून घेतली. ज्याप्रमाणे सुरत व इतर स्मार्ट सिटीमध्ये पाण्याचा पुनर्रवापर केला जातो. त्या प्रमाणे औद्योगिक वसाहत व इतर गावांना खर्चासाठी प्रक्रिया केलेले पाणी देता येते का याबाबतीत विचार व्हावा. त्याप्रमाणे प्रक्रिया केलेले पाणी पुनर्रवापरासाठी उपयोगात आणावे. महापालिकेला आणखीन एसटीपी प्लॅन्टची आवश्यक आहे का याबाबत विचारणा केली. कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे यांनी अमृत योजना टप्पा २ अंतर्गत राज्य शासनाकडे शहराच्या वेगवेगळया ठिकाणी एसटीपीचे विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केलेला आहे. राज्य शासनाकडून मंजूरी होवून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला जाणार असलेचे सांगितले. यावेळी एसटीपी प्लॅन्टमधील लायब्ररीमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल केले जाणारे परिक्षणची पाहणीही त्यांनी केली

 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर नागाळा पार्क येथील विन्स हॉस्पीटलजवळील लोकनगरी प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. हा प्रकल्प पुर्ण:त्वास आला असून प्रकल्प चांगाल झाला असलेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. याठिकाणी राहत असलेल्या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत याठिकाणी २५० घरे मंजूर आहेत. त्यापैकी आर्थीक दृष्टया दुर्बल असलेल्या १३२ लाभार्थ्यांना १ बी.एच.के.ची घरे दिली जाणार आहेत. तर अल्प उत्पन्नधारक ११८ लाभार्थ्यांना २ बी.एच.के.ची घरे दिली जाणार आहेत. यानंतर पुईखडी येथील स्वप्नपुर्ती येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पाला भेट दिली. याठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २१४ घरे मंजूर आहेत. त्यापैकी आर्थीक दृष्टया दुर्बल असलेल्या १८८ लाभार्थ्यांना १ बी.एच.के.ची घरे दिली जाणार आहेत. तर अल्प उत्पन्नधारक २६ लाभार्थ्यांना २ बी.एच.के.ची घरे दिली जाणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील इतर प्रकल्पाच्या तुलनेत सर्वात स्वस्त घरे उपलब्ध करुन दिली जाणार असलेने त्यांनी महापालिकेचे अभिनंदन केले. महापालिकेने असा प्रकल्प स्वत:च्या जागेवर उभा करावा अशा सूचना त्यांनी केल्या. यानंतर राहत असलेल्या लाभार्थ्यांच्या फ्लॅटमध्ये समक्ष भेट देऊन फ्लॅटची पाहणी केली. घरातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या. लाभार्थ्यांनीही या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *