Share Now
कोल्हापूर /प्रतिनिधी : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यातून एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा पार पडली.
विद्यार्थी आणि पालकांना www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या लिंकवर निकाल पाहता येईल. तसेच निकालाची प्रतही घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
Share Now