Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी :
गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणी आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोमटेश मध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियांका पाटील उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील हे होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राची शहा यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात उदय पाटील म्हणाले गोमटेश विद्यापीठ संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आली आहे. आज शाळेने २१ वर्षे पूर्ण केली आहेत. सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या या संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. ज्ञान, संस्कार आणि शिस्त या त्रिसूत्रीवर शाळेची उभारणी झाली आहे. सुशिक्षित वर्गास शिकवणे हे खूप सोपे असते पण अशिक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना घडवण्याचे कार्य गोमटेश ने पार पाडले आहे आणि खरंतर ही संस्थेची खासीयत आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली जोशी यांनी ही मनोगत व्यक्त केले. आभार शोभा इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली देशमाने यांनी केले.
चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांना पावसाळी दिवस, माझी शाळा, मंदिर, वसुंधरा दिन, स्वच्छ भारत आणि कोरोनाव्हायरस असे विषय देण्यात आले होते विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात त्यामध्ये भाग घेतला. कार्यक्रमास भारती चौगुले, अश्विनी हत्ती, वर्षा केनवडे, सुभाष इंगळे आदी शिक्षक उपस्थित होते.