Share Now
Media Control Online
आवश्यक संख्याबळ नसतानाही विविध डावपेच आणि राज्यसभा निकालाने दिलेल्या कॉन्फिडन्सच्या बळावर फडणवीस पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन आमदारांमध्ये जान भरली. शिवसेना सोडता सर्वच पक्षांना अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागत आहे.
मतदान सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झाले. त्यांनी अनिल परब आणि अनिल देसाई यांच्याकडून सकाळच्या घडामोडींची माहिती घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांना मार्गदर्शन केलं. मतदान करताना ५ आमदारांच्या गटाने मतदान करावं. मतदान करताना कुणीही गडबड करु नये. ज्या प्रमाणे मतदानाच्या सूचना दिल्यात, त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिल्या
Share Now