काँग्रेस नेते-फडणवीस हास्य विनोदात रंगले…!

MEDIA CONTROL ONLINE

काँग्रेस नेते मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील विधिमंडळाच्या कॉरिडॉरमधून जात होते. तेवढ्यात समोरुन देवेंद्र फडणवीसही त्यांना दिसले. मतदानाच्या ऐन धामधुमीत तीन काँग्रेस नेत्यांना एकत्र पाहून पाहून फडणवीसांनी त्यांची फिरकी घेतली. ‘आम्हाला वाटलं आमची तीन मतं इकडं आहेत’, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या विनोदावर सगळेच नेते खो खो हसले. पण शांत बसतील ते सतेज पाटील कसले… त्यांनीही ‘तो मी नव्हेच’ म्हणत फडणवीसांचं विनोदी आक्रमण परतावून लावलं.

Advertisements

मग एकमेकांच्या मतदानाविषयी फडणवीस थोरातांनी परस्परांना माहिती दिली. पहिल्या टप्प्यात आमच्या भरपूर आमदारांचं मतदान झालं, असं थोरातांनी फडणवीसांना सांगितलं. त्यावर बरं बरं झालं, आम्हीही तसंच केलंय, असं फडणवीसांनी म्हटलं. गेली १० दिवस एकमेकांना पराभूत करण्याचा चंग बांधलेले नेते आज मात्र सगळं काही विसरुन हास्यविनोदात रंगून गेले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *