Share Now
Read Time:1 Minute, 14 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात सेनेला मोठे खिंडार पडले आहे. राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यापाठोपाठ क्षीरसागर यांनीही. शिंदे गटात प्रवेश केला आहे.आता जिल्ह्यातील पाच माजी आमदारही याच वाटेवर असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
क्षीरसागर यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातील चार माजी आमदारही शिंदे गटासोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील व सत्यजीत पाटील यांचा समावेश आहे. सध्या तरी माजी आमदारांच्या प्रवेशाला राजकीय महत्त्व नसले तरी पुढील आठ दिवसात ज्या घडामोडी होतील.
Share Now