विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या स्पर्धेच्या युगात वृत्त देण्यासाठी खूप स्पर्धा असली तरी वृत्तनिवेदकाने गडबड करून चालत नाही सर्वसामान्य लोकांना समजतील असेच सोप्या व सरळ भाषेत बातमीचे सादरीकरण केले पाहिजे. लोकांच्या व्यवहारातील शब्द आणि त्यांची रोजची बोलली जाणारी भाषा यांचा वापर करून बातमी खूपच सोपी कशी बनवता येईल याची कला वृत्तनिवेदक यांना असली पाहिजे.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ.ग.गो जाधव पत्रकारिता अभ्यासन आणि राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील लक्ष्मी महाविद्यालय यांनी संयुक्तरीत्या आयोजित कार्यशाळेमध्ये चेतन मिठारी आणि पल्लवी गोखले बोलत होते.
चेतन मिठारी आणि पल्लवी गोखले यांनी प्रत्यक्षरीत्या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थी व पत्रकार यांच्याकडून बातमी वाचायची कशी, कॅमेरासमोर नक्की कसे उभे राहायचे, आवाजातील फरक, कपडे कोणते असावेत, हावभाव कसे असावेत, बातमीतील वास्तविकता या सर्व गोष्टींचे त्यांनी स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवले विविध प्रकारच्या बातम्यांमधून निवेदकाचे हावभाव कसे असावेत याविषयी विद्यार्थ्यांकडून त्यांनी बातम्यांचे वाचन करून घेतले.उत्तम न्यूज अँकर कसा घडू शकतो यातील सर्व बारकावे पल्लवी गोखले आणि चेतन मीठारी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. पद्मश्री डॉ. ग गो जाधव पत्रकारिता अभ्यास सणाचे समन्वयक डॉ.शिवाजी जाधव यांनी चेतन मिठारी पल्लवी गोखले तसेच सर्व विद्यार्थी वर्गाचे आभार मानले.