कोल्हापुरात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात हजारो शिवसैनिक एकवटले…

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 31 Second

विशेष वृत्त अजय शिंगे

 कोल्हापूर/प्रतिनिधी : नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी विरोधात कोल्हापुरातील हजारो शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात एकत्र आले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक दसरा चौक येथे एकत्र जमत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत हे दाखवून दिले.

 कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक माजी आमदार सुजित मिंचेकर सत्यजित पाटील सरूडकर उल्हास पाटील यांच्यासह , जिल्हाप्रमुख संजय पवार ,विजय देवणे ,मुरलीधर जाधव ,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रविकिरण इंगवले ,हर्षल सुर्वे ,स्मिता सावंत मांढरे, माजी महापौर उदय साळोखे ,शिवसेनेचे कोल्हापूरचे पहिले आमदार सुरेश साळोखे , आदी सहभागी झाले होते .यावेळी शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करत आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

“उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं” या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

दसरा चौकातून निघालेली ही पदयात्रा बिंदू चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विसर्जित करण्यात आली. दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही पदयात्रा मार्गस्थ झाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी कोल्हापुरातील शिवसैनिक नेहमीच सोबत राहतील असं सांगितलं. पद यात्रेदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. दरम्यान कोल्हापूरातील एकमेव माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले.त्यामुळे पदयात्रेतील शिवसैनिकांनी क्षीरसागर यांच्या बद्दल देखील संताप व्यक्त केला.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठेतील शिवालय शहर कार्यालय आणि निवसस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *