राजर्षी शाहू जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सारथी मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४:  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार, २६ जून रोजी सकाळी ९.३० वाजता सारथी संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 

सारथी संस्थेमार्फत सामाजिक उपक्रम म्हणुन हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) चे व्यवस्थापकीय संचालक अशोक पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *